लोकसभेसाठी विरोधक मला घाबरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:28 AM2018-01-29T00:28:32+5:302018-01-29T00:29:11+5:30

लोकसभा निवडणुकीचा कधी विचारही केला नव्हता. मात्र येणा-या निवडणुकीत कुणी अंगावर आल्यास त्यास रोखण्यास आपण सक्षम असल्याने विरोधकांच्या तंबूत घबराट पसरल्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रविवारी येथे बोलताना सांगितले.

I was afraid of opposition to the Lok Sabha | लोकसभेसाठी विरोधक मला घाबरले

लोकसभेसाठी विरोधक मला घाबरले

googlenewsNext

राजूर : लोकसभा निवडणुकीचा कधी विचारही केला नव्हता. मात्र येणा-या निवडणुकीत कुणी अंगावर आल्यास त्यास रोखण्यास आपण सक्षम असल्याने विरोधकांच्या तंबूत घबराट पसरल्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रविवारी येथे बोलताना सांगितले. भाजप पदाधिका-यांवर त्यांनी नाव न घेता टीका केली.
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजूर येथे शिवसेनेच्या वतीने अंगणवाडीतील २५१ बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, भानुदास घुगे, माधवराव हिवाळे, कैलास पुंगळे, सुरेश तळेकर, जि.प.सदस्या शोभा कैलास पुंगळे, एकनाथ महाराज, अरविंंद थोटे, महेश पुरोहित यांची उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले, भोकरदन तालुक्यात जाणीवपूर्वक शिवसैनिकांवर अन्याय केला जात असून सूडाचे राजकारण होत आहे. विरोधकांच्या तंबूत घबराट पसरली असून शिवसैनिकांनी विचलित न होता संयम बाळगावा. विरोधकांना अंगावर घेण्यास सक्षम असल्याचे खोतकर यांनी खा.रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता सांगितले.
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणाºयांचे विरोधकांनी काय हाल केले, हे सर्वांना माहिती आहे. राजूरसह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजनेबरोबर ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही खोतकर यांनी दिली. प्रास्ताविकात माजी तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी पाणी पुरवठा, शैक्षणिक सुविधा, मंगल कार्यालय, वैद्यकीय, पशुवैद्यकीय सुविधा इ. सुविधांची राजूरला गरज असल्याचे सांगितले. यावेळी माधवराव हिवाळे, रतनकुमार नाईक, युवा सेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब पुंगळे, विनायक पुंगळे, कैलास गबाळे, गणेश ढाकणे, सागर बदर, रामसिंग सोैळंके, उमेश भोपळे, निवृत्ती पुंगळे, शिवाजी जगताप, रामेश्वर टोणपे, रामेश्वर जंजाळ, अरूण डोळसे, साहेबराव पवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: I was afraid of opposition to the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.