माणसाने विवेक बुद्धीने कार्य केल्यास पुण्य घडते - इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:28 AM2021-01-22T04:28:21+5:302021-01-22T04:28:21+5:30
मंठा : मनुष्य जन्म पुन्हा-पुन्हा मिळत नसून, याच जन्मात माणसाने विवेक बुद्धीने विचार करून वागल्यास पुण्य घडते, असे प्रतिपादन ...
मंठा : मनुष्य जन्म पुन्हा-पुन्हा मिळत नसून, याच जन्मात माणसाने विवेक बुद्धीने विचार करून वागल्यास पुण्य घडते, असे प्रतिपादन बाबासाहेब महाराज इंगळे यांनी केले.
मंठा तालुक्यातील रामतीर्थ येथे झोल परिवाराच्या वतीने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तुकाराम महाराज बाहेकर, निवृत्ती महाराज कांगणे, युवा कीर्तनकार, श्रीहरी महाराज बाहेकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मनुष्य जन्म हा मागितल्याने मिळत नाही. माणसाने जन्माला येऊन जन्माचे सार्थक करून घेतले पाहिजे. बुद्धीला पटेल ते नाही तर विवेक बुद्धीने विचार करुन वागले पाहिजे. कितीवेळा जन्माला यावे, किती व्हावे फजित, तुकाम्हणे धरी आठवण या देही, असे अनेक पारमार्थिक दाखले देऊन आई-वडिलांची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गजानन उफाड, पद्माकर पेवेकर, शिवाजी काकडे, रघुनाथ थोरात, भाऊसाहेब खरात, नामदेव वाडीकर, बाबासाहेब महाराज इंगळे यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती.
-------------------------------------