औरंगाबादनंतर जालन्यातही अवैध गर्भपात प्रकरण; पतीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:13 IST2023-02-07T14:12:46+5:302023-02-07T14:13:45+5:30

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील महिलेचा औरंगाबादमध्ये अवैध गर्भपात, खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांच्या सतर्कतेने गुन्हा उघडकीस

Illegal abortion case in Jalna after Aurangabad; A case has been filed against the doctors along with her husband | औरंगाबादनंतर जालन्यातही अवैध गर्भपात प्रकरण; पतीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल

औरंगाबादनंतर जालन्यातही अवैध गर्भपात प्रकरण; पतीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल

बदनापूर ( जालना): तालुक्यातील सोमठाणा येथील एका विवाहितेचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी पती, डॉक्टरांसह अन्य दोघांवर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथे प्रकृती बिघडल्याने घाटी रुग्णालयात दाखल महिलेचा अवैध गर्भपात करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

तालुक्यातील सोमठाणा येथील एका विवाहितेचा 11 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद येथे अवैधरीत्या गर्भपात करण्यात आला. त्यानंतर जास्त त्रास होऊ लागल्यामुळे तिला जालना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत आरोग्य विभाग व पोलिसांना कळविले. त्यानंतर बदनापूर पोलिसांनी महिलेचा जवाब घेऊन तिचा पती, बदनापूर तालुक्यातील एक डॉक्टर, डॉक्टरचा मित्र व गर्भपात करणारा डॉक्टर अशा चार आरोपींच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात अवैध गर्भपाताचा गुन्हा दिनांक 6 फेब्रुवारी रोजी रात्री दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टरसह ज्यांचा सहभाग आहे त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. 

Web Title: Illegal abortion case in Jalna after Aurangabad; A case has been filed against the doctors along with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.