विनापरवाना स्फोटके; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:07 AM2018-06-01T01:07:04+5:302018-06-01T01:07:04+5:30
सोयगाव देवी शिवारात विनापरवाना स्फोटके बाळगल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ६ लाख १३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील सोयगाव देवी शिवारात विनापरवाना स्फोटके बाळगल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ६ लाख १३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे़
स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विनोद गडदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३१ मे रोजी सोयगाव देवी मंदिराच्या शिवारामध्ये एक इसम विनापरवाना स्फोटके बाळगुन विहिरीमध्ये बार उडवित असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावरून पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हनुमंत वारे, गोकुळ कायटे, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, विष्णू कोरडे, विलास चेके, ईश्वर भिसे यांनी या ठिकाणी २ वाजेच्या दरम्यान छापा मारला असता शिवनाथ कौतिकराव राऊत (रा़ सोयगाव देवी) हा ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २१ सी ८८४२) वर कॉप्रेशर, व स्फोटके त्यामध्ये २१९ स्फोटक पिना व २८६ तोटे घेऊन आढळला.
या बाबत परवाना आहे काय यांची विचारणा केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्या विरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.