गोदापात्रातून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:24 AM2018-10-22T00:24:14+5:302018-10-22T00:24:53+5:30
वाळू लिलावाच्या पावत्यात हेरफेर करुन अंबड तालुक्यताील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : वाळू लिलावाच्या पावत्यात हेरफेर करुन अंबड तालुक्यताील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रला धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे महसुल प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसापासून आपेगाव परिसरातील गोदावरी पात्रातून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन रात्रदिवस वाळूची चोरी होत आहे. याकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्याचे कायम दुर्लक्ष होत आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने शुक्रवारी सकाळी वाळूने भरलेल्या हायवा, आणि वाळू चे उत्खनन करत असलेला विनाक्रमांकाचा एक जेसीबी नदीपात्रातून जप्त केला. तलाठी कोनेरकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी जप्त करुन गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केला. तलाठी रमेश कोनेरवार यांच्या फियार्दीवरून जेसीबी चालक रघुनाथ भागवत कातखेडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र संबधीताविरुध्द थातून मातूर करवाई करण्यात आली. कारवाई केल्यानंतरही अवैध उपसा थांबण्याचे नाव घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे सध्या पावसाने दडी दिल्याने नदी पात्रात पाणी नसल्याने वाळू उपसा करणाºयांची चांगलीच चलती आहे. याकडे वरिष्ठ लक्ष देतील का अशी विचारणा होत आहे.
दुर्लक्ष : तस्करांना अभय कुणाचे?
आपेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दिवस-रात्र हायवा भरून दिले जात असल्याने त्यांना अभय कुणाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे.कारण ४५ ब्रॉस जप्त वाळूसाठा ३२ हजार रुपयात ५ दिवसात उचलण्याच्या आटीवर राजेंद्र चौधरी यांना देण्यात आलेला आहे.राजेंद्र चौधरी यांनी अजून ताबा घेतला नाही, तरीही आपेगावातून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दिवस-रात्र राजरोस अवैधवाळू तस्करी होते कशी? हा महसूलच्या वरिष्ठांसाठी संशोधनाचा विषय आहे, तर आपेगाव क्षेत्रात कार्यरत असलेल्या तलाठी व मंडाळाधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे.