पारध परिसरातील रायघोळ नदी पात्रातून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:53+5:302021-01-23T04:31:53+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथून वाहणाºया रायघोळ नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. ...
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथून वाहणाºया रायघोळ नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. वाळू उपशामुळे रस्त्यांची वाट लागली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस होत असल्याने रायघोळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू साठा झाला आहे. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्कार रात्रंदिवस दहा ते बारा ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू उपसा करीत आहे. वाळूची वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने जाता असल्याने जागोजागी रस्ता फुटला आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. बांधकाम विभागाकडून तीनवेळा रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली. मात्र, वाळूची ट्रॅक्टर जात असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड झाले आहे. वारंवार रस्त्याची दुरूस्ती करावी लागत असल्याने शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असतानाही पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी व पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळी
अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याने पारध ते पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर खड्डे पडले आहेत.