पिकअप व ट्रॅक्टरमधून अवैध वाळू तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:30 AM2018-11-28T00:30:57+5:302018-11-28T00:31:07+5:30
आपेगाव ते कोठाळा पर्यंतच्या गोदावरीच्या पट्ट््यातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल व पोलिसांनी दंड थोपटून अवैधवाळू कारवाईचा सपाटा लावून लाखोचा दंड वसूल करून, वाहने जप्त केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : आपेगाव ते कोठाळा पर्यंतच्या गोदावरीच्या पट्ट््यातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल व पोलिसांनी दंड थोपटून अवैधवाळू कारवाईचा सपाटा लावून लाखोचा दंड वसूल करून, वाहने जप्त केली आहेत.
सोमवारी मध्यरात्री आपेगाव येथून ट्रॅक्टर तर मंगळवारी सकाळी सात वाजता औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक करणारी टाटा - एसी पिकअपमधून अवैध वाळू भरून जात असल्याची माहिती खबऱ्याने दिली. मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक हनुमंत वारे, पो.कॉ. गणेश लक्कस यांनी पैठण फाट्यावर टाटा- एसी मालवाहू पिकअप अडवली असता त्यामध्ये एक ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आला. अवैध वाळू तस्कर लढवत असलेल्या विविध युक्तीमुळे महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी चक्रावून गेले आहेत. पैठण फाट्यावर अवैध वाळू तस्करी व वाहतूक करताना टाटाएसी पिकअप क्र. एम.एच.२०.ईजी २९७९ व एक आपेगावातील ट्रॅक्टर असा तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून चालक-मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या ११ महिन्यात महिन्यात महसूल व पोलिसांनी शंभरहून अधिक अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करुन हजारोंचा महसूल बुडवणा-या तस्करांकडून लाखोचा दंड वसूल केला आहे.
वारंवार वाळू माफियांवर कारवाई करूनही त्याचा कुठलाच परिणाम होत नसल्याचे वास्तव या निमित्ताने पुढे आल्याचे दिसून आले.