३ लाख विद्यार्थ्यांचे गोवर, रुबेला लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:32 AM2019-01-02T00:32:42+5:302019-01-02T00:33:48+5:30

आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३ लाख ६ हजार ५३४ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे

Immunization of 3 lakh students, rubella vaccine | ३ लाख विद्यार्थ्यांचे गोवर, रुबेला लसीकरण

३ लाख विद्यार्थ्यांचे गोवर, रुबेला लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३ लाख ६ हजार ५३४ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, अजून १ लाख १ हजार ६६६ विद्यार्थ्यांना लसीकरण देणे बाकी आहे. लसीकरण राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये पुन्हा लसीकरणाचे सत्र राबविल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी विवेक खंतगावकर यांनी दिली.
केंद्र सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून पाच आठवड्याच्या कालावधीमध्ये गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
यात जिल्ह्यातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळा, मदरसे, सीबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विद्यालय, आदी शाळांमध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येत आहे. ही मोहिम आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बालविकास विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे.
यासाठी आरोग्य विभागाला जिल्ह्यातील २३८९ शाळांमधील ४ लाख ८ हजार विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसीकरणाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत प्रत्येक शाळेत जावून ३ लाख ६ हजार ५३४ विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली.
परंतू, लसीकरणाच्या दिवशी जे विद्यार्थी गैरहजर होते. त्यांना पुन्हा लसीकरण देण्यात येणार असून, ज्या शाळांचे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी बाकी आहे. त्या शाळांमध्ये पुन्हा लसीकरणाचे सत्र राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळांचे १०० पेक्षा कमी विद्यार्थी बाकी आहे. त्यांना अंगणवाडी केंद्रात होत असलेल्या लसीकरणादरम्यान, लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खंतगावकर यांनी सांगितले.
एकूणच या लसीकरणामूळे भविष्यातील आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Immunization of 3 lakh students, rubella vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.