जुनी पेन्शन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:55 AM2021-03-13T04:55:06+5:302021-03-13T04:55:06+5:30
अंबड : माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर ...
अंबड : माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अंबड शाखेच्या वतीने १० मार्च रोजी तहसीलदारांना देण्यात आले.राज्यातील शाळांच्या संच मान्यतेत जुनी निर्धारण पद्धती अवलंबावी, २००५ पूर्वी नेमणूक असलेल्या खासगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अघोषित शाळांची यादी घोषित करून तत्काळ अनुदानाची अंमलबजावणी करावी, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना नियमाप्रमाणे प्रचलित अनुदान द्यावे, बक्षी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, कोरोना वर्ष विशेष बाब म्हणून राज्यातील दहावीच्या परीक्षांमध्ये ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांच्या गृहपाठाचा समावेश करावा, पन्नास टक्के गुणांची लेखी परीक्षा शाळास्तरावर आयोजित करावी, आदी मागण्या तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी निवेदनाद्वारे केल्या. या निवेदनावर राजेंद्र वैद्य, संजय पैठणकर, जगन्नाथ गायकवाड, बाळासाहेब देशपांडे, उज्ज्वला शेटे, सुधाकर घायतडक, रामदास कुलकर्णी, सुरेश पाटणकर, माणिक दानवे यांची नावे आहेत.
फोटो- अंबड टिचर
कॅप्शन - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देताना राजेंद्र देशमुख, राजेंद्र वैद्य, संजय पैठणकर, जगन्नाथ गायकवाड, बाळासाहेब देशपांडे, उज्ज्वला शेटे आदी.