प्रत्यक्ष कृतीला महत्त्व हेच गांधी विचाराचे गमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:50 AM2019-02-12T00:50:49+5:302019-02-12T00:51:05+5:30
गांधी विचारावर फक्त विचाराने अंमल करता येत नाही, तर करके देखो हेच गांधी विचाराचे उपयोजन ठरते, असे प्रतिपादन मुंबई येथील व्हीजेटीआयचे अधिष्ठाता संजय मंगला गोपाळ यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गांधी विचारावर फक्त विचाराने अंमल करता येत नाही, तर करके देखो हेच गांधी विचाराचे उपयोजन ठरते, असे प्रतिपादन मुंबई येथील व्हीजेटीआयचे अधिष्ठाता संजय मंगला गोपाळ यांनी केले.
येथील जेईएस महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आजच्या संदर्भात गांधी विचार आणि युवा या विषयावर आयोजित पाच दिवसीय निवासी १५ व्या राज्यस्तरीय गांधी विचार शिबिराचा समारोप सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव श्रीनिवास भक्कड, पुरुषोत्तम बगडिया, ज्ञानप्रकाश मोदाणी, प्राचार्य डॉ.जवाहर काबरा, मनोज ठाकरे, डॉ.यशवंत सोनुने आणि डॉ. महावीर सदावर्ते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मनोज ठाकरे यांनी सादर केलेल्या क्रांती गीताने झाली तर जेष्ठ सतारवादक सखाराम बोरूळ आणि श्रीकांत मुकिम यांनी सादर केलेल्या राम धूनने झाली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी केले. प्रारंभी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विष्णू दौलतराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुढे बोलताना गोपाळ म्हणाले, गांधींचे व्यक्तिमत्व, वैचारिकत्व हे सर्वव्यापी आहे. गांधी विचारांचा शोध घेणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून आपण गांधींचा शोध स्वच्छता, तंटामुक्त अशा गटा- गटात घेतो. महापुरुषांची आपसात तुलना करतो असे न करता त्यांचा त्याग महत्त्वाचा मानून राष्ट्रउभारणीत मदत करावी असेही ते म्हणाले. आजचा विकास आपण निसर्गाला वजा करून करतो आहे. त्यामुळे आपला शाश्वत विकास होत नाही. जंगलतोड करून, निसर्गाचा ºहास करुन कधीच विकास होत नसतो. हेच गांधी विचारांचे सार तरुणांनी लक्षात घ्यावे.
उद्योजक ज्ञानप्रकाश मोदानी म्हणाले, जेईएस सारखे महाविद्यालय हे खऱ्या अर्थाने ज्ञानतीर्थ झाले आहेत. गेल्या ६१ वर्षापासून या पावन भूमीत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. आपल्या शाळा- महाविद्यालये ही ज्ञानतीर्थे बनली पाहिजेत असेही ते म्हणाले.
याप्रसंगी उद्योजक सुनील रायठठ्ठा, माजी उपप्राचार्य हरिकिशन मुंदडा, उपप्राचार्य डॉ. संध्या रोटकर, प्रा. बसवराज कोरे, डॉ. कैलास इंगले, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. प्रतिभा श्रीपत, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. ज्योती धर्माधिकारी, डॉ. दादासाहेब गिºहे, डॉ. उमेश मुंढे, भास्कर पडूळ, डॉ. राज रणधीर, बाबूराव व्यवहारे, प्राचार्य राम भाले, डॉ. रावसाहेब ढवळे, डॉ. धर्मेंद्र राजपूत, ज्ञानेश्वर वाघमारे, लक्ष्मण झरेकर आदींची उपस्थिती होती.
या शिबिरात प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील ८ विद्यापीठातील ७७ शिबिरार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वसंत ऊगले, डॉ.वसंत पवार, डॉ.शिवानंद मुंढे, डॉ. प्रवीण चंदनशिवे आदींनी प्रयत्न केले.