भाजप १८ - महाविकास आघाडी 0; रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये भाजपचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 04:32 PM2022-12-26T16:32:17+5:302022-12-26T17:42:11+5:30

आज १६ जागांसाठी मतमोजणी करण्यात आली, दोन जागा बिनविरोध निवडून आल्या

In Raosaheb Danven's Bhokardan BJP Dominating all the seats in the Agricultural Produce Market Committee | भाजप १८ - महाविकास आघाडी 0; रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये भाजपचा दणका

भाजप १८ - महाविकास आघाडी 0; रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये भाजपचा दणका

googlenewsNext

- फकिरा देशमुख
भोकरदन (जालना) :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने १८ पैकी १८ जागा जिंकून बाजार समिती परत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीला भोपळा मिळाला आहे. महाविकास आघाडीला एकही संचालक निवडून आणता आला नसल्याने त्यांचा या ठिकाणी मोठा पराभव मानण्यात येत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी रविवारी  दि.२५ डिसेंबर रोजी मतदान झाले. भोकरदन तालुक्यातील सहा गावांतील १३ मतदान केंद्रांवर मतदान झाले या निवडणुकीसाठी २ हजार ८२४ मतदार पैकी २ हजार ५८४ मतदारांनी हक्क बजावला होता.
भोकरदन बाजार समितीच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेभाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली राजुरेश्वर शेतकरी विकास पॅनल तर माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल आमने-सामने निवडणुकीच्या मैदानात होते.

१८ पैकी दोन जागांवर यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे दोन संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १६ जागांवर देखील झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस च्या नेत्यांना  एकही संचालक निवडून आणता आला नसल्याने परत बाजार समितीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, निर्मलाताई यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक दिसून आले. ढोल ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख, सभापती कोतिकराव जगताप, आशाताई पांडे, समाधान शेरकर, डाक्टर चंद्रकांत साबळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता
भोकरदन-जाफ्राबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना स.न. १९७२ ला झाली. सुरुवातीची काही वर्षे सोडली तर सलग साधारण ३० वर्षांपासून या बाजार समितीवर भाजपाची सत्ता कायम आहे. आणि आता परत प्रचंड बहुमताने विजय मिळवत बाजार समितीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांनी बाजार समितीवरील आपली सत्ता कायम ठेवली आहे. त्यानंतर (ता.२८) ऑगस्ट २००८ ला जाफ्राबादची बाजार समिती स्वतंत्र करण्यात आली. 

सोळा संचालकांमधून निवडून आलेले उमेदवार 
ग्रामपंचायत मतदार संघ:- 

आनंदाबाई रामराव ढाकणे,(843)यशोदाबाई लक्ष्मण मळेकर, (838)अनिल शेषराव राऊत,सुमनबाई कडुबा शेरकर, (874) ग्रामपंचत अनुसूचित जाती/जमाती:- टिकाराम धनसिंग मिमरोट, (632) ग्रामपंचत सर्वसाधारण मतदार संघ:-नंदकुमार लक्ष्मण गिर्हे ,(661)कल्पना संजय काकडे, (638)व्यापारी मतदार संघ :-सुभाष भिकनराव देशमुख,(334)सुभाष सांडु जंजाळ (333)

सहकारी संस्था मतदार संघ: 
बालाजी रामभाऊ औटी,(822)अर्चना मुकेश चिने, (820)कौतिकराव नामदेव जगताप,(828)प्रमोद प्रभाकर कुलकर्णी,(916)मगनराव काशिराम मुगटराव,(778)अलका भागवत पोटे,(767)नजीर महमद ईलीयास शेख(751) शिंदे गट तर हमाली मापाडी मतदार संघातून सोनाजी गणपत दानवे (बिनविरोध), व सहकारी संस्था(वी,जा/भ, ज/वी.मा. प्र) मतदार संघातून रामलाल चव्हाण (बिनविरोध) हे निवडून आले आहेत यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संजय भोईटे पी बी वरखडे, परेश बेरा, बी आर गिरी, आर आर गिराम, बी आर काकडे यांनी या निवडणुकीसाठी काम पाहिले.

Web Title: In Raosaheb Danven's Bhokardan BJP Dominating all the seats in the Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.