जालना रोटरी एक्स्पोचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:32 AM2017-12-16T00:32:03+5:302017-12-16T00:32:55+5:30

शेतक-यांना उपयुक्त सुलभ तंत्रज्ञान निर्मितीला उद्योजकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. येथील कलश सीड्सच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय रोटरी जालना एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Inauguration of Jalna Rotary Expo | जालना रोटरी एक्स्पोचे उद्घाटन

जालना रोटरी एक्स्पोचे उद्घाटन

googlenewsNext

जालना : शेतक-यांना उपयुक्त सुलभ तंत्रज्ञान निर्मितीला उद्योजकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. येथील कलश सीड्सच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय रोटरी जालना एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकिळ, रोटरीचे अध्यक्ष व्यंकटेश चन्ना, महिको सीड्सचे राजेंद्र बारवाले, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, रोटरीचे अध्यक्ष अकलंक मिश्रीकोटकर, एक्स्पोचे प्रोजेक्ट चेअरमन सुनील रायठठ्ठा, सचिव हेमंत ठक्कर, दीपक बगडिया, शरद लाहोटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले की, रोटरीच्या क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक्स्पोच्या माध्यमातून अनेक उद्योजक घडले आहेत. एक्स्पोमध्ये संपूर्ण राज्यभरातून तंत्रज्ञानावर आधारित विविध उद्योगांची मांडणी होऊन स्थानिक उद्योग हे जगाच्या पातळीवर गेले आहेत. हे रोटरी एक्स्पोचे मोठे यश आहे. जालन्यात औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारावे, अशी स्थानिक उद्योजकांची मागणी आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. एक्स्पोच्या माध्यमातून प्राप्त होणरा निधी गरजू रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी शिबिरासाठी केला जात असल्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर व्यंकटेश चन्ना यांनी रोटरी क्लबचा विस्तार आणि त्या माध्यमातून राबविल्या जाणाºया सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ.कैलास गोरंट्याल यांनी एक्स्पोला शुभेच्छा दिल्या. डॉ. रमेश अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. दीपड बगडिया यांनी आभार मानले. कार्यक्रमास भावेश पटेल, राजेंद्र भारुका, जगदीश राठी, जितेंद्र पित्ती, घनश्याम गोयल, राजेश श्रीवासन, समीर अग्रवाल, दुर्गेश अग्रवाल, सतीश अग्रवाल, लता चन्ना, किशोर पंजाबी यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, स्थानिक उद्योजक, व्यावसायिक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-------------
प्रदर्शनातून युवकांचा चालना-कोकिळ
तंत्रज्ञानाला नवीन संकल्पनांची जोड देऊन ते वापरण्यास अधिक सोपे करण्याची क्षमता युवकांमध्ये असते. अशा प्रदर्शनातून नवसंकल्पांना प्रेरणा मिळते, असे सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकिळ या वेळी म्हणाले. उद्योगात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी धोके कमी झाले झाल्याचे ते म्हणाले.
---------------
जालना उद्योजकांची नगरी- बारवाले
उद्योग हा जालन्यातील लोकांच्या रक्तात आहे. स्थानिक भूमिपुत्रांनी येथील उद्योगांची उभारणी केली आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून आपणाला नवनवीन संकल्पांतून प्रगतीचा वेग वाढवायचा आहे. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग, सीडहबच्या माध्यमातून जालना भविष्यात प्रगतीच्या वाटेवर जाईल, असे या वेळी महिकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले यांनी सांगितले.

Web Title: Inauguration of Jalna Rotary Expo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.