तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:04 AM2019-09-07T01:04:04+5:302019-09-07T01:05:24+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन आॅफ जालनाच्या वतीने येथील कामगार कल्याण केंद्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजचा युवक उद्याचे भविष्य आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांनी जास्तीत- जास्त वेळ मोबाईलमध्ये न घालता मैदानी खेळ व मेहनतीवर लक्ष केंद्रित करावे. तसेच शरीराबरोबरच बुद्धीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासाबरोबरच तायक्वांदो सारख्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे, असे प्रतिपादन एडीएसचे पोनि. यशवंत जाधव यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन आॅफ जालनाच्या वतीने येथील कामगार कल्याण केंद्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक जगन्नाथ काकडे, असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वीतेसाठी राष्ट्रीय पंच सचिन आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पंच फहीम खान, सय्यद निसार, मयूर पिवळ, सचिन गादेवाड, आकाश बिलघे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हाभरातून विविध शाळा-महाविद्यालयातून १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे संचालन प्रांजल पिवळ तर आभार प्रशिक्षक सय्यद निसार यांनी मानले.