अस्वच्छतेमुळे गोद्री ग्रामस्थांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:12+5:302021-09-15T04:35:12+5:30
भोकरदन : तालुक्यातील गोद्री येथील विविध भागांतील नाल्या तुंबल्या आहेत. तुंबलेल्या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येत असून, दुर्गंधीही पसरली आहे. ...
भोकरदन : तालुक्यातील गोद्री येथील विविध भागांतील नाल्या तुंबल्या आहेत. तुंबलेल्या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येत असून, दुर्गंधीही पसरली आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील गोद्री येथील नाल्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. अनेकांच्या घरासमोर अस्वच्छ पाणी जमा होत आहे. स्वच्छता नावालाच असल्याने मोठी दुर्गंधी पसरली असून, गावात साथरोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावातील गल्लोगल्ली कचरा साचला असून, ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे, शिवाय विविध आजार पसरण्याची शक्यता आहे. ही बाब पाहता, ग्रामपंचायतीने लक्ष देऊन गावात स्वच्छता मोहीम राबवावी, तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
स्वच्छता मोहीम राबवावी
आमच्या घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायतीने लक्ष देऊन गावात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी ईश्वर निकाळजे, सुधाकर निकाळजे यांनी केली आहे.
फोटो