तपासासह शिक्षेचे प्रमाण वाढवा : मल्लिकार्जुन प्रसन्ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:40 AM2021-06-16T04:40:16+5:302021-06-16T04:40:16+5:30
गेल्या काही महिन्यांपासून जालना पोलीस रडारवर आहेत. कधी वाढत्या चोऱ्या तर खून, दरोडे आणि अन्य गुन्हे वाढलेले आहेत. त्यातील ...
गेल्या काही महिन्यांपासून जालना पोलीस रडारवर आहेत. कधी वाढत्या चोऱ्या तर खून, दरोडे आणि अन्य गुन्हे वाढलेले आहेत. त्यातील काही गुन्ह्यांची उकलही केली आहे. त्याबद्दल प्रसन्ना यांनी तपास अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. असे असले तरी पोलिसांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
जिल्ह्यातील शिक्षेचा टक्का कसा वाढेल याबद्दल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण करावे, असेही प्रसन्ना म्हणाले.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस उपअधीक्षक चतुर्भुज काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, कदीम ठाण्याचे प्रभारी महेश टाक, तालुका जालना ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके, चंदनझिरा ठाण्याचे निरीक्षक यशवंत जाधव, सदरबाजार ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर आदींसह जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चौकट
आत्मचिंतन करण्याची गरज
गेल्या महिन्याभरात लाचखोरी तसेच युवकाला मारहाण करणारा व्हायरल व्हिडिओ, केंद्रीय मंत्र्यांच्या जाफराबाद येथील कार्यालयाची झाडाझडती यामुळे जालना पोलीस चर्चेत आले आहेत. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असून, पोलिसांनी कोणाचाही हस्तक्षेप सहन न करता तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.