पीककर्ज वाटपाची गती वाढवा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:31 AM2018-06-15T00:31:26+5:302018-06-15T00:31:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
गुरूवारी बँकर्सची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांनी आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या पीककर्जाची माहिती दिली. यावेळी एसबीआय, देना बँक तसेच युनियन बँकसेह अन्य बँकांची पीककर्ज वाटपाची गती ही अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने जास्तीचे मनुष्यबळ वाढवून शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. तसेच यात दिरंगाई करणा-या बँकांची तक्रार त्यांच्या मुख्यालयाकडे करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिला.
यावेळी १८ जून रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शेतक-यांसाठी कर्ज मिळण्यासाठी मेळावे घेण्याचा निर्णय बैठकीत देण्यात आला.
खरीप हंगामासाठी यंदा बाराशे कोटी रूपयांचे पिककर्ज वाटापाचे उद्दिष्ट असल्याचे इलमकर यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत एसबीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापकांनी मनुष्यबळ तातडीने वाढण्यात येईल असे सांगितले. बैठकीस जिल्हा सहनिबंधक नारायण आघाव यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक यांच्यासह प्रशासकीय अधिका-यांची उपस्थिती होती.
आढावा : उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नांची गरज
जालना जिल्ह्याच्या कृषीपत आराखड्यात यंदा खरीप हंगामासाठी एक हजार २४५ कोटी रूपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, आता खरीप हंगाम सुरू झाला असून, आता पर्यंत केवळ दहा टक्के एवढेच कर्जाचे वाटप झाले आहे. शेतकºयांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे म्हणून यंत्रणेने आळस झटकून करावे, असे जिल्हाधिका-यांनी या बैठकीत सांगितले.