आयटीआय क्षेत्राकडे मुलींचा वाढता कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:01 AM2018-07-12T01:01:35+5:302018-07-12T01:01:45+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढला असून, मोठ्या प्रमाणात मुली आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी जालना येथील आयटीआय संस्थेत जवळपास ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी प्रवेश घेतला असून यात इलेक्ट्रिकलमध्ये २५ टक्के मुलींनी प्रवेश घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढला असून, मोठ्या प्रमाणात मुली आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी जालना येथील आयटीआय संस्थेत जवळपास ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी प्रवेश घेतला असून यात इलेक्ट्रिकलमध्ये २५ टक्के मुलींनी प्रवेश घेतला होता.
सध्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रमाणही जास्त दिसत आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात त्यांची जाण्याची तयारी असते. औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रातही मुलींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच जिल्ह््यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात मुली प्रवेश घेत आहे. मागील वर्षी ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी येथील आयटीआय संस्थेत प्रवेश घेतला होता. यात इलेक्ट्रिकल कडे मुलींचा ओघ असून, जवळपास २५ टक्के मुलींनी यात प्रवेश घेतला आहे. तर वायरमन, मोटर मॅकेनिकल याला २० टक्के मुली प्राधान्य देत आहे. तर फिटर आणि डिझेल मॅकेनिकल यासह इतर कोर्ससकडेही मुली जाताना दिसत असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य देविदास राठोड यांनी दिली. आयटीआय सारख्या क्षेत्रात ८५ ते ९० टक्के पेक्षा जास्त गुण असलेले मुले प्रवेश घेत आहे. याचे मुख्य कारण म्हणेज, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने याकडे सर्वांचाच कल दिसत आहे. त्यामुळे मुलांबरोबर मुलीही या क्षेत्राला प्राधान्य देताना दिसत आहे. दरम्यान, येथील आयटीआय संस्थेत राज्यभरातून विद्यार्थी येत प्रवेश घेत आहे. मागील वर्षी मुलींनी इलेक्ट्रिकलला प्राधान्य दिले होते. यावर्षी मुली इतरही कोर्सेसला प्राधान्य देण्याची आशा आहे. यावर्षीही मुलींचे प्रमाण या क्षेत्राकडे जास्त असू शकते, असेही ते म्हणाले.