जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:36 AM2019-01-02T00:36:08+5:302019-01-02T00:36:42+5:30

उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले

The industry in Jalna suffered due to water scarcity | जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

जालन्यातील उद्योग पाण्याअभावी संकटात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उद्योग, व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योग पाण्याच्या कमतरेतेमुळे संकटात सापडले असून, आज घडीला औद्योगिक वसहातीतील उद्योगांचा श्वास हा टँकरच्या भरवशावर सुरू आहे. जालना पालिकेने दररोज एमआयडीसला ५ एमएलडी पाणी द्यावे आणि महिन्याला ५० लाख रूपये घ्यावेत असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, तो सध्या नाकारण्यात आला असून, अंतर्गत जलवानीचे काम पूर्ण झाल्यावर यावर विचार करू असे पालिकेकडून सांगण्यात आले. तर औद्योगिक वसहातीसाठी पैठण येथील नाथसागरातून शेंद्रा आणि जालनासाठीची ४५० कोटी रूपयांची योजना मंजूर आहे, परंतु ती या ना त्या कारणाने रखडली आहे.
एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवेंसेदिवस वाढत असल्याने ग्रामिण भागातून शेकडो कामगार हे रोजगार शोधण्यासाठी जालन्यात येत आहेत. त्यातच जालन्यातील उद्योगही संकटात असल्याने त्यांना काम देणे अडचणीचे ठरत आहे. जालन्यातील प्रमुख उद्योग म्हणून स्टील उद्योगाकडे पाहिले जाते. या उद्योगातील सात बड्या स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगांना दररोज ५ एमलएलडी पाणी लागते आणि औद्योगिक विभागाकडून संपूर्ण एमआयडीसीला केवळ दीड एमलएलडी पाणी मिळत आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून उपयोगात आणले जात आहे.
जालन्यातील अनेक स्टील उद्योजकांनी पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी, तिच्या मर्यादा आहेत. त्यामुळे शेततळ्यांचा आधारही या उद्योगाने घेतला आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने हे शेततळे भरले नसल्याने आज जवळपास लाखो रूपये हे टँकरच्या पाण्यावर उद्योजकांचे खर्च होत आहेत. एकूणच पाण्या अभावी शहरातील बांधकाम व्यवसायावरही परिणाम दिसून आला असून, अनेकांनी बांधकामे पुढे ढकलली आहेत.
जालना : पाणीपुरवठा वाढविण्याचे प्रयत्न
या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक महांडळाचे औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुधीर नागे यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना आणि शेंद्रा येथील उद्योगांना थेट पाणीपुरवठा करण्यासाठी ४५० कोटी रूपयांची ७२ एमएलडीची योजना मंजूर आहे. परंतु ती योजना या ना त्या कारणाने रखडली आहे. या योजनेतून जायकवाडी धरणातून थेट जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात येणार होते; परंतु या योजनेचे काम सध्या कासव गतीने सुरू असले तरी ती लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. असे असले तरी जानेवारीअखेरपर्यंत जालन्याला सध्यापेक्षा दोनपट जास्तीचा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
- सुधीर नागे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ

Web Title: The industry in Jalna suffered due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.