देवाच्या नामस्मरणात अथांग शक्ती : गणेश महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:58+5:302021-01-18T04:27:58+5:30
जालना तालुक्यातील कुंबेफळ येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात शनिवारी भगवंताच्या ...
जालना तालुक्यातील कुंबेफळ येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात शनिवारी भगवंताच्या नावाची महिमा सांगताना देळेगव्हाण येथील बालकीर्तनकार गणेश पंडित महाराज बोलत होते. आयुष्यात कुठल्याच प्रकारची बाधा न होण्यासाठी संत तुकाराम महाराज यांच्यासारखी भक्ती करून सत्वर देवाची प्राप्ती करा, असे सांगून पंडित महाराजांनी देवाच्या नामजपाचे अनेक दृष्टांत उपस्थितांना सांगून शंकाचे निरसन केले. परमेश्वराच्या भक्तीने संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानेश्वरी लिहून जगासमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आपण माग्रक्रमण करायला हवे. महिलांनीही लहानपणापासून बालकांवर योग्य संस्कार लावण्याचे काम कारावे, जेणेकरून तो बाळ तारुण्यात वाम मार्गाला लागणार नाही, असेही ते म्हणाले.
जीवनात सुखी आणि समाधानी राहण्यासाठी सतत देवाची भक्ती करा. आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नसल्याची ग्वाही महाराजांनी यावेळी दिली. शिवाय भारतीय संस्कृती जोपासण्याठी गोमातेचे रक्षण करा. गाय विकून पापाचे धनी होऊ नका, असा उपदेशही पंडित महाराजांनी दिला. याप्रसंगी गणेश महाराज गव्हारे, बळी महाराज गव्हारे, कैलास पंडित यांच्यासह भजनी मंडळाची उपस्थिती होती.