तब्बल ५५ हजार शेतक-यांची माहितीच जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:29 AM2018-01-31T00:29:25+5:302018-01-31T00:29:37+5:30

कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ५४ हजार ५९९ शेतक-यांची माहिती बँकेने आॅनलाईन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत नसल्याचे समोर आले आहे.

The information about 55 thousand farmers is unmatched | तब्बल ५५ हजार शेतक-यांची माहितीच जुळेना

तब्बल ५५ हजार शेतक-यांची माहितीच जुळेना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ५४ हजार ५९९ शेतक-यांची माहिती बँकेने आॅनलाईन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतक-यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. संबंधित शेतक-यांच्या याद्या जिल्ह्यातील २४ बँकांमध्ये लावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी आतापर्यंत एक लाख ५१ हजार २०६ शेतक-यांसाठी ९५९ कोटी १३ लाख रुपये बँकांना प्राप्त झाले आहेत. पैकी एक लाख ११ हजार ३४ शेतक-यांच्या कर्जखात्यात ५९७ कोटी, तीन लाख, ६९ हजार रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ५४ हजार ५९९ शेतक-यांची माहिती बँकेने आॅनलाईन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत नसल्याने या शेतक-यांची नावे अद्याप कर्जमाफीच्या पात्र यादीत आलेली नाही.
माहिती जुळत नसलेल्या शेतक-यांच्या नावांच्या याद्या जिल्ह्यातील मध्यवर्ती व राष्ट्रीयीकृत बँकांना पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित बँकांनी याद्या बँकेत शेतकºयांना पाहण्यासाठी लावल्या आहेत.
ज्या शेतक-यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्यांनी आपल्या बँकेत पाच फेब्रुवारीपर्यंत आवश्यक कागदपत्रे तातडीने जमा करावीत, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: The information about 55 thousand farmers is unmatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.