रोटरी परिवाराकडून सरकारीसह खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनची गळती काढण्याचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:57+5:302021-04-27T04:30:57+5:30
हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबिवण्यासाठी येथील डॉ. हितेश रायठठ्ठा यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सविस्तरपणे मांडला होता. त्यानंतर याला गती ...
हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबिवण्यासाठी येथील डॉ. हितेश रायठठ्ठा यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सविस्तरपणे मांडला होता. त्यानंतर याला गती आली. याआधी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी औरंगाबादेत आमच्या चमूकडूनच ही गळती शोधण्याचे महत्त्वाचे काम करून घेतल्याची माहिती या प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक तथा रोटरी क्लबचे पदाधिकारी गोविंद मंत्री दिली. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी उद्योजक सुनील रायठठ्ठा, डॉ. सुनील बेदरकर, हरिप्रसाद भक्कड हे पुढाकार घेत आहेत.
चौकट
सर्व रुग्णालयांसाठी मदत करणार
कोरोना काळात रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रोटरी परिवार नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे ऑक्सिजनसंदर्भात काही तरी केले पाहिजे या हेतूने आम्ही ऑक्सिजनची गळती काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांची मोठी मदत झाली. अन्य काही रुग्णालयांमध्येही आम्ही हे काम करणार आहोत.
गोविंद मंत्री, प्रकल्प प्रमुख, जालना.