कृषी विभागातील चौकशीचे गुऱ्हाळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:27 AM2020-12-23T04:27:31+5:302020-12-23T04:27:31+5:30
परंतु यात अनेक प्रकरणांमध्ये नेमक्या काय त्रुटी आहेत, हे पुढे आले नाही. यात अनेकांना चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवून ...
परंतु यात अनेक प्रकरणांमध्ये नेमक्या काय त्रुटी आहेत, हे पुढे आले नाही. यात अनेकांना चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवून खुलासा मागविला जात आहे. याप्रकरणी दोन कृषी सेवकांना निलंबित केले असून, यात मोठे मासे अद्यापही गळाला लागले नसल्याचे दिसून येते. जे दोन कृषिसेवक निलंबित केले आहेत त्यांच्यावर जवळपास ९४ लाख रुपयांच्या अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. असे असले तरी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पथक नेमून १,१७२ प्रकरणांची छाननी सुरू असल्याचे कृषी अधीक्षक शिंदे यांच्याकडून सांगितले जात आहे.
या प्रकरणात १२ वितरकांचे परवाने निलंबित केले असून, ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादित करणाऱ्या कंपन्यांकडून खुलासा, तसेच त्यांनी वितरकांना किती साहित्याचा पुरवठा केला याचा तपशील मागविला जात असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
पीकविम्याचा भरणा करूनही अहवाल नाही
बदनापूर तालुक्यातील काजळा येथील शेतकऱ्यांनी डाळिंबाचा पीकविमा भरला होता; परंतु कृषी खात्याने त्यांचा अहवाल विमा कंपनीकडे पाठविला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनात केला आहे. या निवेदनावर अशोक पांढरे, आबासाहेब पैठणे, मधुकर जाधव आदींची स्वाक्षरी आहे. यासंदर्भात कृषी विभागाशी या शेतकऱ्यांनी संपर्क साधूनही त्यांचे समाधान झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.