कांदा बीजोत्पादन प्रकल्पाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:12+5:302021-03-06T04:29:12+5:30
कृृषी विज्ञान केंद्राद्वारे दरवर्षी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयामार्फत करार पद्धतीने बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. या वर्षी कृषी ...
कृृषी विज्ञान केंद्राद्वारे दरवर्षी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयामार्फत करार पद्धतीने बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. या वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तीन एकर क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला आहे. या प्रक्षेत्राची संयुक्त पाहणीचे सदस्य म्हणून डॉ. गुप्ता जालना येथे आले होते. केव्हीकेच्या भेटीत त्यांच्यासमवेत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी पवन बैनाडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक देशमुख यांची उपस्थिती होती. त्यानंतर डॉ. गुप्ता यांनी शिवणी येथे भेट दिली. उद्धव खेडेकर यांनी सलग २५ एकर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन घेतले आहे. उत्कृष्ट आणि पूर्ण शास्त्रीय आधारावर अत्यंत कमी पाण्यात आलेले पीक पाहून डॉ. गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.