बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त गावांची सदाभाऊ खोत यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:59 AM2018-08-17T00:59:13+5:302018-08-17T00:59:35+5:30
बोंडअळीचा हल्ला हा चिंतेचा विषय आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष घालून शेतकºयांना हवी ती मदत करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी बदनापूर येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : जिल्ह्यातील बोंडअळीचा हल्ला हा चिंतेचा विषय आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष घालून शेतकºयांना हवी ती मदत करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी बदनापूर येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
ही बैठक सायंकाळी कृषी महाविद्यालया पार पडली. यावेळी आ. नारायण कुचे, लक्ष्मण मोहिते, गजानन राजबिडे, जिल्हा अधीक्षक व्ही.एस. माईनकर आदींची उपस्थिती होती. राज्यमंत्री खोत यांनी प्रारंंभी शेलगाव येथील शेतकरी हरिभाऊ अंभोरे यांच्या शेतात जाऊन पिकावर प्रादुर्भाव झालेल्या बोंडअळीची पहाणी करुन कापसाची लागवड कधी करण्यात आली होती. बोंडअळीच्या प्रादुभार्वापासून वाचण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आदींची माहिती जाणून घेत मात्रेवाडी येथील शेतकरी शिवाजी रामराव महाडीक यांच्या शेतात जाऊन तेथील कापूस पिकाची पहाणी केली.
यावेळी राज्यमंत्री खोत म्हणाले की, जालना जिल्ह्यात ११३ गावात २० हजार २०० हेक्टर क्षेत्राला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बोंडअळीच्या प्रादुभार्वाची कारणे शोधण्यात आली असून, यावर उपाययोजना करण्यात येत आहे. शेतक-याना मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे उपलब्ध करुन देण्याबरोबरच लिंबोळी अर्क, किटकनाशकेही अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पेरणीपूर्वी राज्यात शेतकरी संवाद अभियान राबविण्यात आल्याची माहिती देत या अभियानाच्या माध्यमातून शेतक-यांनी कोणत्या कंपनीचे बियाणे वापरले आहे, पेरणी केव्हा केली आहे व कोणती काळजी घेतली आहे ही माहिती सदरील अभियानादरम्यान कृषी अधिका-यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन घेतली आहे.