रेशीम उद्योगाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:44+5:302021-09-16T04:37:44+5:30

या युनिटमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्माण झाला आहे. तसेच जालना रेशीम कोष बाजारपेठेतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कोषांना चांगला ...

Inspection of silk industry by District Collector | रेशीम उद्योगाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रेशीम उद्योगाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Next

या युनिटमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्माण झाला आहे. तसेच जालना रेशीम कोष बाजारपेठेतील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कोषांना चांगला दर मिळत आहे. या युनिटमधून निर्यातक्षम ४ ए ग्रेडचा दर्जेदार निर्यातक्षम रेशीम धागा तयार होत आहे. ॲटोमॅटिक रेशीम रिलींग युनिटचे संचालक सूरज टोपे यांनी जिल्हाधिकारी यांना प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर कचरेवाडी शिवारातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लाभार्थी शिवाजी जाधव यांच्या रेशीम कीटक संगोपन कामाची पाहणी केली. या वेळी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरिष्ठ तांत्रिक सहायक एन. टी. दखनी, कचरेवाडी गावातील मनरेगा योजनेचे लाभार्थी राजेंद्र कचरे, हरिभाऊ ठोकळ, मदनराव जाधव, शंकर कचरे, आप्पासाहेब कचरे, ग्रामरोजगारसेवक लहू जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते व इतर अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो

Web Title: Inspection of silk industry by District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.