झटपट सोयाबीन; चालू हंगामात सोयाबीनला दहा हजारांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:23+5:302021-09-15T04:35:23+5:30

जालना : गत काही वर्षांत कापूस पीक रोगराईच्या कचाट्यात सापडले आहे; तर दुसरीकडे सोयाबीनला अधिकचा दर मिळत आहे. ...

Instant soybeans; Ten thousand soybeans in the current season | झटपट सोयाबीन; चालू हंगामात सोयाबीनला दहा हजारांचा दर

झटपट सोयाबीन; चालू हंगामात सोयाबीनला दहा हजारांचा दर

Next

जालना : गत काही वर्षांत कापूस पीक रोगराईच्या कचाट्यात सापडले आहे; तर दुसरीकडे सोयाबीनला अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकरी कापसाचा अधिक पेरा करीत होते. परंतु, बोंडअळीमुळे कापूस पिकांतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती मिळत नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. चालू वर्षात जवळपास दीड लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. कमी वेळात सोयाबीन उत्पादन देणारे बियाणे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा कल या कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीनकडे वळला आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनला बाजारपेठेत आठ ते दहा हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. या दरामध्ये पुढील काही कालावधीत वाढ होण्याची शक्यता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

झटपट येणारे सोयाबीन

सोयाबीनचे ८० ते ९० दिवसांत उत्पादन देणारे काही बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. अनेक शेतकरी या बियाण्यांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतात. तंत्रज्ञानाचा वापर करून केला जात असल्याने कमी वेळेत उत्पादन मिळते.

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

जिल्ह्यातील बाजारपेठेत १०० ते १०५ दिवसांमध्ये उत्पादन देणारेही बियाणे आहेत. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून या बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

११० दिवसांच्या पुढे येणारे बियाणे हे टोकन पद्धतीने पेरले जाते. त्यामुळे कमी बियाण्यांमध्ये अधिक उत्पादन मिळते. अधिक काळ जोपासना केल्याने झाडांचा आकार आणि उंची वाढून उत्पादनही वाढताना दिसते.

गत पाच वर्षांत मिळालेले दर

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादन मिळत नाही. कपाशीवर रोगराई पसरत आहे. आता शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. गत काही वर्षात सरासरी दर चांगला मिळत आहे.

- तुळशीराम तांगडे

जिल्ह्यात यापूर्वी कपाशीचा पेरा अधिक होत होता. परंतु, बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय निवडला आहे.

- जुमान चाऊस

कृषी अधीक्षक म्हणतात

जिल्ह्यात कपाशीचे पीक यापूर्वी घेतले जात होते; परंतु, विविध कारणांनी शेतकरी आता सोयाबीनकडे वळले आहेत. तीन महिन्यांत येणारे हे पीक आहे.

- भीमराव रणदिवे, कृषी अधीक्षक

वर्ष क्विंटलमध्ये दर

२०१७ ३२०० ते ४०००

२०१८ ३४०० ते ४५००

२०१९ ३८०० ते ५०००

२०२० ३००० ते ९०००

२०२१ ८००० ते १००० (दरवाढीचा अंदाज)

Web Title: Instant soybeans; Ten thousand soybeans in the current season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.