नुकसानीचे पंचनामे करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:21 AM2019-10-31T01:21:07+5:302019-10-31T01:21:49+5:30
विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाततोडांशी आलेला घास हिरावाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, विमा कंपनीसह सरकारकडून शक्य तेवढी जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करतांना दिली.
या संदर्भात पत्रकारांनाही त्यांनी सांगिले की, अनेक गावात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे वास्तव आपण पाहिले आहे. . या नुकसानिची पंचनामे करून त्याचा अहवाल द्यावा असे निर्देश आपण जिल्हाधिका-यांना दिल्याचे दानवे म्हणाले.
केंद्रियराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २९ आक्टोबर रोजी तालुक्यातील वाकडी, कठोरा बजार, वाडी खुर्द या शिवारातील शेतात जाऊन शेतक-याच्या मका, सोयाबीन, व कपाशीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतक-यानी अक्षरश: दानवे याच्या समोरच हबरडा फोडला होता, दानवे यांनी या शेतक-याची समजूत काढत आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत दिली.तसेच तात्काळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हापरिषद सदस्य विठ्ठल चिंंचपुरे, रामकृष्ण सुसर, गजानन सिरसाठ, बंजरग मेहेर, भागचंद मेहेर, काशीनाथ सिरसाठ, श्रीराम सिरसाठ, दादाराव सिरसाठ, मुस्ताक पठाण, गप्फार पठाण, अंकुश दौड, अजबराव नवल, प्रकाश वाघ, खंडू वाघ, अलीखॉ पठाण, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.