जालना जिल्ह्यातील दूध संस्थांना वाढीव परवानगी घेण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:40 AM2018-10-07T00:40:51+5:302018-10-07T00:41:34+5:30
दूध संकलनाच्या मुद्यावरून जो पेच निर्माण झाला होता, त्या संदर्भात लोकमतमधून शुक्रवारी वृत्त प्रसिध्द करताच यंत्रणेने खुलासा केला आहे. त्यानुसार आता ज्या संस्थांकडे केवळ शंभर लिटर दूध संकलनाची मर्यादा आहे, ती त्यांना वाढवून हवी असल्यास त्यांनी तशी लेखी परवानगी जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावी असे सूचविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दूध संकलनाच्या मुद्यावरून जो पेच निर्माण झाला होता, त्या संदर्भात लोकमतमधून शुक्रवारी वृत्त प्रसिध्द करताच यंत्रणेने खुलासा केला आहे. त्यानुसार आता ज्या संस्थांकडे केवळ शंभर लिटर दूध संकलनाची मर्यादा आहे, ती त्यांना वाढवून हवी असल्यास त्यांनी तशी लेखी परवानगी जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावी असे सूचविण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील अनेक नव्याने नोंदणीकृत संस्थांना त्यांनी केवळ दररोज शंभर लिटरच दूध संकलन करावे असे पत्र सर्व संस्थांना पाठविण्यात आले होते. तसेच जालना तसेच माहोरा येथील दूध संकलन आणि शितीकरण केंद्रासही तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून नवीन पेच निर्माण झाल्याने संस्थांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड होत होती.
या संदर्भात शनिवारी लोकमतमधून वृत्त प्रसिध्द होताच, दूग्ध विकास विभागाने त्याची तातडीने दखल घेतली. तसेच दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून, परवानगी घेण्याचे आवाहन केले.