उघड्या चेंबरवर ढापे टाकण्याचे नगरविकास विभागाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:35 AM2021-08-14T04:35:06+5:302021-08-14T04:35:06+5:30
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, भरतनगर, दधीच चौक, टाऊन हॉल, कालीकुर्तीसह शहरातील प्रमुख रस्ते, विविध वसाहतींमध्ये नगरपरिषदेच्यावतीने ...
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, भरतनगर, दधीच चौक, टाऊन हॉल, कालीकुर्तीसह शहरातील प्रमुख रस्ते, विविध वसाहतींमध्ये नगरपरिषदेच्यावतीने भुयारी गटारांची कामे करण्यात आली आहेत. दोन भुयारी गटार पाईपला जोडण्यासाठी असलेल्या चेंबरवर काही ठिकाणी ढापे टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरून साथ रोग पसरण्याची शक्यता आहे. चेंबरवर ढापे टाकण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत नगरपरिषद अभियंत्यांना ढापे टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही ठिकाणी ढापे टाकण्यात आले. मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने हे ढापे काही दिवसांतच तुटून पुन्हा चेंबर उघडे पडले होते. याबाबत ॲड. धन्नावत यांनी छायाचित्रांसह मुख्यमंत्री कार्यालयात ऑनलाईन निवेदनाद्वारे तक्रार केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने समस्येचे गांभीर्य ओळखून नगरविकास विभाग -२ कडे ॲड. धन्नावत यांचा अर्ज हस्तांतरित केला. नगरविकासचे कक्ष अधिकारी उदय सार्दळ यांनी मंगळवारी समस्या निवारणाबाबत निर्देश दिल्याची माहिती ॲड. धन्नावत यांनी दिली.