इंटरचेंज पॉर्इंटचा निर्णय होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:59 AM2018-11-22T00:59:52+5:302018-11-22T01:00:28+5:30

मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गात गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असलेले चढ-उतार (इंटरचेंज पॉर्इंट) स्थळाचे घोंगडे प्रशासकीय पातळीवर अडीच वर्षानंतरही भिजत घोंगडे कायम आहे

Interchange Point Decision pending | इंटरचेंज पॉर्इंटचा निर्णय होईना

इंटरचेंज पॉर्इंटचा निर्णय होईना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गात गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असलेले चढ-उतार (इंटरचेंज पॉर्इंट) स्थळाचे घोंगडे प्रशासकीय पातळीवर अडीच वर्षानंतरही भिजत घोंगडे कायम आहे.
इंटरचेंज पॉर्इंट इतरत्र हलविल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा समृध्दी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नारायण गजर यांनी म्हटले आहे की, जालना शहरालगत गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रशासनाने इंटरचेंज पॉर्इंट प्रस्तावित केला होता, तो रखडला आहे.
दरम्यान हा नवीन इंटरचेंज पॉर्इंट औद्योगिक वसाहतीच्या परिसरात हलविण्याची तयारी सुरु केली असून तेथे औद्योगिक वसाहतीच्या रेडीरेकनरप्रमाणे ७२० रुपये प्रति चौ.मी. या दराने जमिनी खरेदी कराव्या लागतील, त्या अनुषंगाने शेड उभारणी, वृक्षारोपण करण्यात आले. यात शासनाचे नुकसान होणार असल्याने याचा विचार सरकारने करावा असेही गजर यांनी सांगितले. जुने जाहीर प्रगटन रद्द करून इंटरचेंज पॉर्इंट हलविण्याबाबत जाहीर प्रगटन प्रसिध्द होताच संघर्ष समिती उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल, असेही गजर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Interchange Point Decision pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.