अंतर्गत पाणीपुरवठा योजना : शंभर कोटींच्या बिलामुळे कंत्राटदाराचं चांगभलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:33+5:302021-07-28T04:31:33+5:30
त्यानुसार जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या मुद्याला आ. कैलास गोरंट्याल यांनी यात लक्ष घालून ही योजना प्रत्यक्ष ...
त्यानुसार जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या मुद्याला आ. कैलास गोरंट्याल यांनी यात लक्ष घालून ही योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी जिवाचे रान केले, तसेच या योजनेसाठी ते काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांनी त्यावेळी स्वपक्षाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून या योजनेसाठी विशेष निधी म्हणजेच जवळपास २५० कोटी मंजूर केले. ही योजना व्हावी म्हणून त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावेळीदेखील जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे हेच होते. या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी मिळून ही योजना पूर्ण केली. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याच हस्ते या योजनेचा थाटात शुभारंभ करून आ. कैलास गोरंट्याल यांनी स्वप्नपूर्ती केली होती.
हे सर्व खरे असले तरी त्यावेळी जालन्याच्या वेशीवर आलेले पाणी जालन्यातील विविध भागांत समप्रमाणात मिळावे म्हणून अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी केंद्र सरकारच्या नगरोत्थान निधीतून जवळपास १३२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यासाठी त्यावेळी खासदार असलेले आणि आज केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले.
चौकट
नऊपैकी आठ जलकुंभांचे काम पूर्ण
अंतर्गत जलवाहिनी अंथरण्यासाठी ज्या एजन्सीला काम दिले होते त्या कंत्राटदाराने शहरात विविध भागांत जलवाहिनी अंथरली आहे, तसेच नऊ जलकुंभ उभारण्याचे या योजनेत ठरले होते. त्यातील आठ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. आता केवळ एक जलकुंभ पूर्ण झाल्यावर या योजनेची हायड्रोलिक टेस्ट घेण्यात येणार आहे. या कामासाठी आतापर्यंत कंत्राटदारास १०४ कोटी रुपयांचे बिल दिले असल्याचे सांगण्यात येते.