‘युरिन डिस्पोजल बॅग’ची आंतरराष्ट्रीय दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:14 AM2019-01-17T01:14:07+5:302019-01-17T01:14:51+5:30

जालन्यातील सिध्दांत सतीश तवरावाला या युवकाने यावर पर्याय शोधला असून, सहज कोणालाही वापरता येईल अशी युरिन डिस्पोजल बँगचे संशोधन केले आहे. त्याच्या या इनोव्हेशनची दखल लंडन येथील न्यूटन फाऊंडेशनने घेतली

International intervention of 'Urine Disposal Bag' | ‘युरिन डिस्पोजल बॅग’ची आंतरराष्ट्रीय दखल

‘युरिन डिस्पोजल बॅग’ची आंतरराष्ट्रीय दखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एखाद्या आजाराने रूग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच भटकंती करणाऱ्यांना अडोशाची जागा शोधताना अनेकवेळा अडचण येते. परंतु यावर जालन्यातील सिध्दांत सतीश तवरावाला या युवकाने यावर पर्याय शोधला असून, सहज कोणालाही वापरता येईल अशी युरिन डिस्पोजल बँगचे संशोधन केले आहे. त्याच्या या इनोव्हेशनची दखल लंडन येथील न्यूटन फाऊंडेशनने घेतली असून, त्याच्या प्रयोगाचे सादरीकरण तसेच त्यात आणखी सुधारणा कशा करता येतील यावर पुढील महिन्यात तो लंडनला १५ दिवसांसाठी जाणार आहे.
या संदर्भात सिध्दांत तवरावालाने सांगितले की, आपण मुंबईतील नरसी मोहनजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यानंतर अहमदाबाद येथे एमबीएची पदवी घेतली. एमबीएची पदवी घेत असतानाच त्यांना नवीन संशोधन प्रकल्प द्यायचा होता. सिध्दातंने या प्रकल्पासाठी स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत शौचालयांचा अभाव अडसर ठरत असल्याचे टिपले आणि युरिन डिस्पोजल विषयावर काम सुरू केले. त्यासाठी त्याला दिल्लतील अमेरिकन दूतावासाची तसेच टेक्सास विद्यापीठातील तीन प्रोफेसरची मोठी मदत झाल्यानेच हे शक्य झाल्याचे सिध्दांतने सांगितले.
यासाठी त्याला केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडून १५ लाख रूपयांचे अर्थसाह्य मिळाले आहे.
विशेष म्हणजे ही युरिन डिस्पोजल बॅग प्रवासाठीच्या वापरण्यात येणा-या बॅगमध्ये ठेवल्यावरही त्यांची दुर्गंधी येत नसल्याचा दावा सिध्दार्थने केला आहे. या बँगमध्ये आणखी कोणते संशोधन करता येईल यावर आता पुढील महिन्यात न्यूटन फाऊंडेशनमध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. जालन्यातील सिध्दांत प्रमाणे भारतातून अन्य चार युवकांच्या संशोधनाचीही निवड न्यूटन फाऊंडेशनने केली असल्याचे सिध्दांर्थ म्हणाला.
या युरिन डिस्पोजल बॅगचे ख-या अर्थाने उत्पादन हे लंडन येथून परतल्यावर अधिक चांगल्या पध्दतीने करण्यात येणार असल्याचे सिध्दांतने सांगितले.
संशोधन काळात त्याने सतत दीड वर्ष या युरिन डिस्पोजल प्रकल्पावर काम केले. त्यानंतर तयार केलेली ही बॅग एका विशिष्ट पेपर पासून तयार केली आहे. या बॅगमध्ये युरिन जमा झाल्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन ती टूथपेस्ट प्रमाणे घनरूप होते. त्यामुळे ही बॅग प्रवासह रूग्णांसाठी वरदान ठरू शकते.

Web Title: International intervention of 'Urine Disposal Bag'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.