आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्या इंदोरमध्ये केले जेरबंद; जालना पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:38 PM2021-02-18T12:38:23+5:302021-02-18T12:46:29+5:30

Robbery Crime News दिवसा घरफोडी करणाऱ्या कुख्यात टोळीवर राज्यातील पाच पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत

Interstate gang leader arrested in Indore; Jalna police action | आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्या इंदोरमध्ये केले जेरबंद; जालना पोलिसांची कारवाई

आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्या इंदोरमध्ये केले जेरबंद; जालना पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देविशेष पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी इंदोर व परिसरात पंधरा दिवसांचा मुक्काम केला.आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह जालना जिल्ह्यात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, बीड, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथे घरफोड्या केल्याची कबुली

जालना : राज्याच्या विविध भागांत दिवसा घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला जालना गुन्हे शाखेने इंदोर येथून जेरबंद केले आहे. ही कारवाई १३ फेब्रुवारी रोजी केली असून, त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.

जालना शहरातील गोपीकिशननगर भागातील घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध जालना गुन्हे शाखेचे पथक घेत होते. या चोरीमध्ये मध्य प्रदेशातील इंदोर येथील आरोपींचा हात असल्याची माहिती पो.नि. भुजंग यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पो.नि. भुजंग, पो.उपनि. दुर्गेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम संबंधित आरोपींचा शोध घेत होत्या. तपासात पवन उर्फ भुरा रामदास आर्या (रा.इंदोर, मध्य प्रदेश) याचे नाव समोर आले होते. आर्या व त्याच्या सहकाऱ्यांनी जळगाव, बुलडाणा, जालना, बीड, सांगली, कोल्हापूर, धारवाडा आदी ठिकाणी अशा चोऱ्या केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर येथे धाव घेऊन आरोपी पवन उर्फ भुरा रामदास आर्या याला जेरबंद केले. त्याच्याकडून कारसह जवळपास १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१५ दिवसांचा मुक्काम
विशेष पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी इंदोर व परिसरात पंधरा दिवसांचा मुक्काम केला. मिळालेली माहिती व आर्थिक विश्लेषण करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह जालना जिल्ह्यात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, बीड, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.

२१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
आरोपी पवन उर्फ भुरा रामदास आर्या याला शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याच्याकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Interstate gang leader arrested in Indore; Jalna police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.