९२४ जणांच्या तपासणीत एकाला बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:28 AM2021-09-13T04:28:19+5:302021-09-13T04:28:19+5:30
जिल्हा आरोग्य प्रशासनाला रविवारी ९२४ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यात ८८१ जणांच्या आरटीपीसीआर तपासणीत एकालाही बाधा झाली नसल्याचे ...
जिल्हा आरोग्य प्रशासनाला रविवारी ९२४ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यात ८८१ जणांच्या आरटीपीसीआर तपासणीत एकालाही बाधा झाली नसल्याचे समोर आले. रॅपिड ॲँटिजनच्या ४३ तपासण्यांमध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित रुग्ण हा अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.११ वर गेला असून, एकूण पॉझिटिव्हिटी रेट ९.७७ टक्के आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ७३५ वर गेली असून, त्यातील ११९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार ५२० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात २५ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात सध्या २५ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी रुग्ण आढळून येत आहेत. आढळून येणारे रुग्ण पाहता नागरिकांनी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.