पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून पाणी तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:27 AM2018-11-28T00:27:08+5:302018-11-28T00:27:19+5:30

निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.

the issue of water release in becoming hot | पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून पाणी तापले !

पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून पाणी तापले !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. परंतु, धरणात केवळ १४ .१५ टक्के जिवंत पाणीसाठा राहिला आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने निम्न दुधना प्रकल्पात पाणी साठ्यात वाढ झाली नाही. पूर्ण पावसाळ््यात केवळ दहा टक्के पाणी साठा वाढला. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक खेड्या - पाड्यांचा व सिंचनाचा भार आहे. यावर्षी धरणातून दोन ते तीन वेळा पाणी सोडण्यात आले.
हे पाणी खाली नदीच्या पात्रात सोडल्याने पाण्याचा मोठा अपव्ययही होत आहे. मध्येच शेतकरीही या पाण्याचा उपसा करत आहे. या धरणातील बँक वॉटरवर शेतकऱ्यांनी लाखो रूपये कर्ज काढून पाईप लाईन केल्या आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. आता धरणात पाणी कमी असल्याने व दररोजच्या उपशाने हे पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे शेतक-यांनाही पाणी मिळेल की, नाही या बाबत शंका आहे. यातच पुन्हा हे पाणी परभणीकडे सोडण्यासाठी मंत्रालय स्तरावर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.
परभणी व जालन्याचे जिल्हाधिकारी पाणी सोडण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत. त्यामुळे आहे, ते पाणी कसे पुरेल या चिंतेत परतूरकर असल्याने हे पाणी आतापासून तापत आहे.
या धरणात संध्या एकूण साठा १४.१५ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ३८ टक्के आहे. आता हे पाणी सोडण्यासाठी एक राजकीय गट प्रयत्नशील आहे. तर दुसरा गट आमचे ह्क्काचे पाणी सोडू देणार नाही, असा पावित्रा घेत विरोध करत आहे. त्यामुळे भविष्यात हे निम्न दुधनाचे पाणी चांगलेच ‘तापण्याची’ शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाणी सोडण्याचा निर्णयही ब-याच अंशी राजकीय गणित मांडूनच घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी सोडायचे की, नाही हा कळीचा मुद्दा होऊ लागला आहे. या धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस घटु लागली आहे. या धरणावरच आता परतूर, सेलू शहरासह ३० ते ४० खेड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. परत आता हे पाणी परभणीकडे सोडण्याचा घाट घातला जात असल्याने येत्या पावसाळ््यापर्यंत धरणातील पाणी पुरेल की नाही, या बाबत शंका आहे.

Web Title: the issue of water release in becoming hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.