वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जात महत्त्वाची नाही- प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:18 AM2018-07-20T01:18:34+5:302018-07-20T01:18:55+5:30
शेकडो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आणि सत्तेपासून वंचित असलेल्या प्रत्येक नागरिकांना मुख्यत्वे त्याचे मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी या दलित वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे वंचितांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन दलित वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेकडो वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, आणि सत्तेपासून वंचित असलेल्या प्रत्येक नागरिकांना मुख्यत्वे त्याचे मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी या दलित वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे वंचितांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन दलित वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
येथील मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहात गुरुवारी दुपारी वंचित आघाडीच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिमांचे बुजगावणे केले जाते
मुस्लिमांचा देशाला धोका आहे, असे बुजगावणे तयार करुन सामान्यांच्या मनात धार्मिक भावना भडकविण्याचे काम विद्यमान सरकार करत आहे. मात्र निवडणूक जवळ येत असल्याने सत्ताधारी शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करून मुस्लिमांच्या दाढीत हात घालून मनूवाद्यांची शेंडी शाबूत ठेवण्याचा डाव आखत आहे. सर्वसामान्यांसह मुस्लिम बांधवांनी देखील हा डाव ओळखण्याची गरज असल्याचे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.