IT Raid: ‘दुल्हन हम ले जायेंगे’च्या गाडीतून IT अधिकारी आले, सोनं अन् पोती भरुन पैसे घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 08:51 AM2022-08-11T08:51:57+5:302022-08-11T08:54:10+5:30

प्राप्तीकरचे रिटर्न्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै रोजी संपली. त्यानंतर, 3 ऑगस्ट रोजी 100 पेक्षा जास्त गाड्यांच्या ताफ्यासह आयटी अधिकाऱ्यांनी जालन्यातील व्यापाऱ्यांवर धाड टाकली

IT Raid: IT officials came from the car of 'Dulhan Hum Le Jayenge' in jalana, took away gold and bags full of cash in raid | IT Raid: ‘दुल्हन हम ले जायेंगे’च्या गाडीतून IT अधिकारी आले, सोनं अन् पोती भरुन पैसे घेऊन गेले

IT Raid: ‘दुल्हन हम ले जायेंगे’च्या गाडीतून IT अधिकारी आले, सोनं अन् पोती भरुन पैसे घेऊन गेले

Next

जालना - शहरातील एका स्टील कारखानदारांवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला असून तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त करण्यात आलं आहे. जालन्यासारख्या ग्रामीण जिल्ह्यात एवढं मोठं घबाड आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या छापेमारीत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले असून 35 पिशव्यांमध्ये या नोटा भरुन ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या 13 तासांपासून ही रोकड मोजण्याचं काम संबंधित विभागातील अधिकारी करत होते. येथील स्थानिक बँकेत जाऊन ही रोकड मोजण्यात आली आहे. विशेष म्हणजे जालन्यात गत आठवड्यात गाडीत आलेल्या अधिकाऱ्यांची एन्ट्रीही मजेशीर होती. 

प्राप्तीकरचे रिटर्न्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै रोजी संपली. त्यानंतर, 3 ऑगस्ट रोजी 100 पेक्षा जास्त गाड्यांच्या ताफ्यासह आयटी अधिकाऱ्यांनी जालन्यातील व्यापाऱ्यांवर धाड टाकली. 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी होते. मात्र, पथकांनी छापे टाकताना व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित लोकांना याची जराही भनक लागू नये, छाप्याच्या तयारीची बातमी लीक होऊ नये याची मोठी सतर्कता बाळगली. नाशिक, पुणे, ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर जणू काही लग्नाला जात असल्याचे भासवत इनोव्हासह इतरही कारवर वर-वधुंच्या नावाचे स्टिकर लावले, तर काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावून कोडवर्डद्वारे ही कारवाई केली. त्यामुळे, अनेकांना ही लग्नासाठी आलेली वरात असल्याचा भास झाला. मात्र, आयटीच्या अधिकाऱ्यांनी करेक्ट कार्यक्रम केला. 

दरम्यान, 6 ते 8 महिन्यांपूर्वीच जीएसटीच्या नाशिक येथील पथकाने आठवडाभर जालन्यात तळ ठोकून तपासणी केली होती. वर्षभरापूर्वीच म्हणजे गत सप्टेंबर महिन्यात जालन्यातील 4 मोठ्या स्टील उत्पादकांच्या घरी आणि कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यातच, रोकड, दागिने यांसह 300 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे प्राप्तीकर विभागाने जारी केलेल्या निवदेनात नमूद केले होते.   

स्थानिक बँकेत नेऊन मोजली रोकड

जालन्यात मिळालेली ही रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली मोजणी रात्री 1 वाजता पूर्ण झाली. म्हणजे जवळपास 13 तास ही कारवाई सुरूच होती. या कारवाईत औरंगाबादेतील दोन बांधकाम व्यावसायिकांवर टाच असल्याची माहिती आहे. या कारवाईत जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर टाच असल्याची माहिती आहे. एसआरजे स्टील, कालिका स्टील, एक सहकारी बँक आणि खासगी फायनान्सर विमलराज सिंघवी, डिलर प्रदीप बोरा यांच्या व्यापारी प्रतिष्ठानवर प्राप्तीकर विभागाने ही कारवाई केली. 

एवढी सापडली मालमत्ता

५८ कोटी रोख.
१६ कोटींचे सोन्याचे दागिने, हिरे.
३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता
१३ तास रोकड मोजली. १ ते ८ ऑगस्ट कारवाई
२६० अधिकारी कर्मचारी, १२० वर वाहनांचा ताफा.
 

Web Title: IT Raid: IT officials came from the car of 'Dulhan Hum Le Jayenge' in jalana, took away gold and bags full of cash in raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.