शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच मज तप फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:15 AM2019-08-18T00:15:02+5:302019-08-18T00:15:42+5:30

मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले.

It was because of my loyalty to the Shiv Sena party ... | शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच मज तप फळाला

शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानेच मज तप फळाला

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुठल्याही कामामध्ये निष्ठा, समर्पण भाव आणि लोकहित लक्षात घेतल्यास त्यातून मिळणारा आनंद आणि पक्षनिष्ठेचे फळ म्हणजेच माझी ही गोदावरी विकास खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरील निवड होय. पूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९८८ मध्ये शिवसेनेशी नाळ जुळली. ती आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून घट्ट बनली आहे. मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले. त्यांची ही मुलाखत
प्राधान्य कोणत्या बाबींना द्याल ?
मराठवाड्यातील जालना जिल्हा हा कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. कागदोपत्री सिंचनाचा अनुशेष पूर्ण झाल्याचे दर्शविले जात असले तरी वास्तव तसे नाही. त्यामुळे सिंचनाच्या अनुशेषाचा अभ्यास करून बापकळ, बरबडा यासह अन्य सिंचन प्रकल्प मार्गी लावून शेती आणि पिण्याला पाणी उपलब्ध करून देण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.
या संधीकडे आपण कसे पाहता ?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला ही महत्त्वाची जबाबदारी लाभली आहे. २००१ ते २००६ या काळात आपण जनतेतून नगराध्यक्ष झालो होतो. तेव्हांही अनेक लोकोपयोगी कामे केली. येथेही हेच धोरण राहणार आहे.
घरातील राजकीय वारसा नसताना केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांनी प्रेरित होऊन आपण राजकारणात प्रवेश केला. कधी यश तर कधी अपयश आले म्हणून पक्षाशी निष्ठा सोडली नाही. अनेक प्रलोभने आली परंतु निष्ठा न ढळू दिल्यानेच राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे पद मिळाले
अनेक प्रकल्प अपूर्ण
सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वॉटरग्रीड योजना प्रस्तावित आहे. तिचे आपण स्वागतच करत असून, असे असले तरी जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा मुद्दा मार्गी लावू .आपण महाबीजचे संचालक असताना देखील जालन्यात प्रक्रिया उद्योग सुरू केला होता.

Web Title: It was because of my loyalty to the Shiv Sena party ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.