जाफराबाद तालुक्यात गावे ‘पाणीदार’साठी ग्रामस्थ सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:48 AM2019-03-19T00:48:15+5:302019-03-19T00:48:37+5:30
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. टेंभुर्णी परिसरासह जाफराबाद तालुक्यात श्रमदानातून अनेक गावे पाणीदार होण्यासाठी पुढे सरसावली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. टेंभुर्णी परिसरासह जाफराबाद तालुक्यात श्रमदानातून अनेक गावे पाणीदार होण्यासाठी पुढे सरसावली आहेत.
तालुक्यातील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी अनेक गावांत सध्या पाणी अडवा पाणी जिरवा चा संदेश देत श्रमदान करण्यासाठी महिला व पुरुष पुढे येत आहे. काही गावात बहीण- भाऊ मिळून शोषखड्डे खोदत आहेत. तर काही ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा हा संदेश दिला जात आहे. यासाठी पानी फाऊंडेशन चे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर इधाटे व सय्यद बिसमिल्ला हे गावागावात जाऊन ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगत आहेत.
जल है तो कल है हा संदेश देत ते पाणी साठविण्याबाबत वेगवेगळे उपक्रम जनतेला सांगत आहेत. या श्रमदानासाठी तालुक्यातील बुटखेडा, पोखरी, पासोडी, चापनेर, बेलोरा, बोरगाव आदी गावांतील ग्रामस्थांनी श्रमदानासाठी नोंदणी केली आहे.