Jalana: जालना जिल्ह्यात एसटीचा अपघात, मुंबईकडे जाणारी बस ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:36 PM2023-08-08T21:36:40+5:302023-08-08T22:12:43+5:30
Jalana ST Bus Accident: जालना जिल्ह्यामध्ये एसटी बसला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाल्याची माहिती मिळत असून, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस ५० फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
जालना जिल्ह्यामध्ये एसटी बसला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाल्याची माहिती मिळत असून, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस ५० फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते. त्यातील ८ प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
पुसद येथून बस मुंबईकडे ४२ प्रवासी घेऊन जात होती. केंधळी पाटीजवळ आल्यावर समोर ट्रक आले. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ५० फुट रस्त्याच्या खाली बस उलटली. त्यात ८ प्रवासी गंभीर जखमी झाले. बस उलटताच नागरिकांनी तातडीने धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. प्रवाशांना तातडीने मंठा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली आहे.