परत एकदा अवर्षणाशी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:10 AM2018-03-29T01:10:24+5:302018-03-29T01:10:24+5:30

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागास लागण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ असलेली टँकर्सची संख्या आत्ता ४० वर गेली आहे. जालना भोकरदन, जाफराबाद, आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.

Jalana residents again facing drought | परत एकदा अवर्षणाशी सामना

परत एकदा अवर्षणाशी सामना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागास लागण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ असलेली टँकर्सची संख्या आत्ता ४० वर गेली आहे. जालना भोकरदन, जाफराबाद, आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.
जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर या चार तालुक्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सार्वाधिक टँकर भोकरदन तालुक्यात सुरू आहेत. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातून फेब्रुवारीतच काही गावांना तीव्र पाणी टंचाईचा करावा लागल्याने गावातून टँकरची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प आणि पाझर तलावात दोन महिने पुरेल इतकाच साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वाधिक निधी पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येतो. यामुळे पाणी टंचाईची शक्यता बघता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून,ज्या तालुक्यातून टँकरची मागणी आली त्यांना तातडीने दखल घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांनी दिली.

Web Title: Jalana residents again facing drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.