Jalana: बंदी असलेल्या कीटकनाशकाची दोन हजार पाकिटे पकडली
By दिपक ढोले | Published: June 2, 2023 11:04 PM2023-06-02T23:04:25+5:302023-06-02T23:05:04+5:30
Jalana: भोकरदन तालुक्यातील राजूर येथे केंद्र शासनाने बंदी घातलेल्या पोरेट कंपनीच्या कीटकनाशकाची दोन हजार पाकिटे जिल्हा भरारी पथकाने शुक्रवारी पकडली.
जालना - भोकरदन तालुक्यातील राजूर येथे केंद्र शासनाने बंदी घातलेल्या पोरेट कंपनीच्या कीटकनाशकाची दोन हजार पाकिटे जिल्हा भरारी पथकाने शुक्रवारी पकडली. पथकाने जवळपास तीन लाख ८४ हजार रूपयांची पाकिटे व चार लाख रूपये किंमतीचे पिकअक असा एकूण ७ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने बंदी घातलेले पोरेट कंपनीचे कीटकनाशक घेऊन एक पिकअप भोकरदन तालुक्यातील राजूर येथे असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथरासह राजूर येथे जाऊन सदरील वाहनास थांबविले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात पोरेट कंपनीची दोन हजार पाकिटे दिसून आली. पथकाने वाहनासह कीटकनाशक जप्त केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी दिली. ही कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक जी. आर. कापसे, कृषि विकास अधिकारी सुधारक कराड, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक आशिष काळुशे, जिल्हा कृषि अधिकारी विशाल गायकवाड, कृषी अधिकारी आर. एल. तांगडे यांनी केली आहे.