जालन्याचा सराईत गुन्हेगार पाच जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:04 PM2019-02-09T13:04:45+5:302019-02-09T13:05:58+5:30
जालना, औरंगाबाद, बीड, परभणी, बुलडाणा या पाच जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
जालना : शहरात खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, दरोडे, खंडणी अशाप्रकारेचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस दोन वर्षाकरीता पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. चंद्रकांत विष्णु जाधव (रा. कैकाडी मोहल्ला) असे आरोपीचे नाव आहे.
चंद्रकांत जाधव याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दरोडे, मारमारी, खंडणी अशाप्रकारेचे गुन्हे दाखल आहे. तसेच आगामी काळात जिल्ह्यात निवडणूक आहे. या निवडणूकीच्या अनुषगाने त्याच्यावर तडीपाराची कारवाई करण्यात आली. यासाठी पोनि. एस. एम. लोहकरे यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तडीपाराचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावरुन उप विभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याला जालना, औरंगाबाद, बीड, परभणी, बुलडाणा या पाच जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय लोहकरे, सपोनि. व्हि. एस. मोर, सुधीर नागरे, कैलास चेके, विठ्ठ्ल खार्डे, डिगांबर चौरे, मनोज हिवाळे, सोमनाथ लहामगे, रमेश काळे, डिगांबर चौरे, मिरा ठोके यांनी पकडून त्याला नेवासा फाटा येथे सोडले.