घाणेगाव ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:56 AM2017-12-19T00:56:12+5:302017-12-19T00:56:12+5:30

वारंवार तक्रार करूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी जांबसमर्थ तलावात जाऊन जलसमाधी आंदोलन केले.

Jalansamadi Movement of Ghanagaon village dwellers | घाणेगाव ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

घाणेगाव ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : वारंवार तक्रार करूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी जांबसमर्थ तलावात जाऊन जलसमाधी आंदोलन केले. महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आंदोलकांची समजूत घालत संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले. चार तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना काही वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आलेला आहे. या गावातील नागरिकांना जांब समर्थ येथील सोसायटीमार्फत संलग्न दुकानातून स्वस्त धान्य वाटप केले जाते. सोसायटीचे धान्य वाटप मात्र परवाना निलंबित असलेल्या जुन्याच विक्रेत्याकडून केले जात आहे. त्यामुळे गावातील अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळत नाही. याबाबत संबंधित ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त महिला व पुरुष सकाळी गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जांबसमर्थ तलाजवळ पोहोचले. सर्वांनी तलावाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास पाण्यातच जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार अश्विनी डमरे, घनसावंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुळसीदास धुमाळ, नायब तहसीलदार गणेश पोलास, पेशकर मोरे, मंडळाधिकारी एस.बेले, तलाठी थालके, लिपिक सुशील जाधव आदी दुपारी एक वाजता जांबसमर्थ तलाव परिसरात पोहोचले. अंबड अग्निशमन दलाच्या पथकाला आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आली. तहसीलदार डमरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित स्वस्त धान्य विक्रेत्यावर कारवाई करण्यासह आंदोलन कर्त्यांच्या अडचणी सोडविण्याचे लेखी लिहून दिले. त्यानंतर चार तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Jalansamadi Movement of Ghanagaon village dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.