जालना जिल्ह्यातील पाणवठे कोरडेठाक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:53 AM2018-10-14T00:53:21+5:302018-10-14T00:54:05+5:30

पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

Jalavata district's Panvotha dryade ...! | जालना जिल्ह्यातील पाणवठे कोरडेठाक...!

जालना जिल्ह्यातील पाणवठे कोरडेठाक...!

Next
ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : नैसर्गिक स्त्रोतातही जेमतेम पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैरसोय होणार असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
जिल्ह्यात १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर वनक्षेत्र पसरले आहे. पाणझडी वनक्षेत्र असलेल्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात हरिण, निलगाई, लांडगे, तडस, मोर, रानडूकर, सारस, वानर आदी प्राण्यांची मोठी संख्या आहे. वन्यप्राण्यांना जीवंत राहण्यासाठी खाद्यासह पाणी महत्वाचा घटक असतो. मात्र जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात लाखो रूपये खर्च करून आठही तालुक्यांतील वनपरिक्षेत्रात ठिकठिकाणी २७ सिमेंटचे पानवठे तयार करण्यात आलेले आहेत. परंतु, यावर्षी जिल्ह्यात पाऊस न पडल्याने पाठवडे कोरडे पडले आहे. तर काही पाणवठ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे येणाºया काळात पाण्यासाठी वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागणार आहे. त्यातच पडलेल्या पावसाचे पाण्याचे योग्य नियोजनाअभावी पाणी अडविण्यात आले नाहीत. नैसर्गिक स्त्रोतातील पाणीही एक महिनाभरच पुरेल. परिणामी, पावसाळ््यातच वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. मात्र, याकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने वन्यप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.
जालना : वनविभागाने लक्ष देण्याची गरज
दिवसेंदिवस वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने प्राण्यांची कमतरता जाणवत असल्याने प्राण्याअभावी पर्यावरणावरही परिणाम होत आहे. याकडे वनविभागाने गांर्भीयाने लक्ष देऊन जिल्ह्यातील वनसंपदा जपण्याची मागणी वन्यप्रेमींसह पर्यावरणावाद्यांकडून केली जात आहे.
सध्या पाऊस नसल्यामुळे सर्वत्रच पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे वन परिसरातही पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी शेताकडे पाण्याच्या शोधात जात आहे. परिणामी, हे प्राणी लागवड केल्या पिकाचे नुकसान करत आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढणार
जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात आतापासूनच पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. यामुळे पाण्याच्या शोधात अनेक हिस्त्र प्राणी गावात येण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहेत. यामुळे वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या गावांमध्ये नेहमीच भितीचे वातावरण असते. यामुळे पाणवठ्यात पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

Web Title: Jalavata district's Panvotha dryade ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.