जाळीचा देव यात्रेला उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:17 AM2020-02-10T00:17:58+5:302020-02-10T00:22:03+5:30
महानुभीव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोकरदन तालुक्यातील श्री. क्षेत्र जाळीचादेव यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : महानुभीव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोकरदन तालुक्यातील श्री. क्षेत्र जाळीचादेव यात्रेला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. रात्री श्री. चक्रधर स्वामींची रथयात्रा व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यात्रोत्सावानिमित्त येथे ५ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सप्ताहाची सांगता मंगळवारी होणार आहे. संस्थानच्या वतीने विविध तयारी करण्यात आली आहे. तसेच टुरिंग टॉकिजसह विविध कटलरीच्या दुकाना येथे लागल्या आहेत. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पारध पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बारव्या शतकात श्री. चक्रधर स्वामींनी येथे येऊन निसर्ग सौंदर्य पाहून येथील जाळीमध्ये काही वेळ विसावा घेऊन ते पुढील भ्रमणासाठी निघून गेल्याची अख्यायिका भाविक सांगतात.