जालना : सात बीएलओंवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:41 AM2018-10-13T00:41:27+5:302018-10-13T00:42:35+5:30

मतदार पुनरीक्षणच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन शुक्रवारी ७ बीएलओ,(बुथ लेवल अधिकारी) आणि एका पर्यवेक्षकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Jalna: Cases filed on seven BLs | जालना : सात बीएलओंवर गुन्हे दाखल

जालना : सात बीएलओंवर गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मतदार पुनरीक्षणच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन शुक्रवारी ७ बीएलओ,(बुथ लेवल अधिकारी) आणि एका पर्यवेक्षकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येथील जालना तहसीलच्या कार्यालयाच्या निवडणुक विभागाकडून १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या दरम्यान विशेष संक्षिप्त मतदार याद्यांचे पुर्नपरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी ३९० बीएलओंची नियुक्ती केली आहे. मात्र नायब तहसीलदारांनी वेळोवेळी घेतलेल्या विशेष बैठकीला बीएलओ वारंवार गैरहजर राहिले. विशेष म्हणजे त्यांना वेळोवेळी नोटीस बजावून बैठकीला हजर राहण्याचे सुचना दिल्या होत्या, मात्र तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला न जुमानता बीएलओ आणि एका पर्यवेक्षकाने बैठकीला हजर झाले नाही. यामुळे मतदार याद्यांच्या कामात अडथळा आला. मतदार याद्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात अडचणी आल्या. विशेष बीएलओंनी पाठविलेल्या नोटीसला कुठल्याच खुलासा केला नाही.
राष्ट्रीय कार्याच्या कामात हलगर्जी पणा केल्यामुळे नायब तहसीलदार दिलीप शेनफड सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन एच.डी जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. संतोष अग्निहोत्री न.प. विवेक जाधव न.प., सुरेश सांगुळे, न.प. पी.जी. खरात जि.प. कन्या प्रशाला, संदीप वानखेडे जि.प., शेख वसीम जि.प. शाळा राममुर्ती, आणि पर्यवेक्षक सॅमसन कसबे न.प यांच्या विरुध्द शुक्रवारी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Jalna: Cases filed on seven BLs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.