जालन्यात अतिक्रमण काढताना स्वच्छता निरीक्षकाला मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी पुकारले काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:02 PM2019-02-01T14:02:20+5:302019-02-01T14:04:51+5:30
या घटनेचा निषेध म्हणून जालना नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन केले.
जालना : येथील नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय खर्डेकर आणि त्यांचे पथक आज सकाळी जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यावेळी परिसरातील अतिक्रमणधारकांनी त्यांना अटकाव करून वाद घातला व धक्काबुकी केली. यानंतर खर्डेकर यांना उपचारासाठी खासजी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेचा निषेध म्हणून जालना नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन केले. जोपर्यंत मारहाण प्रकरणातील आरोपीला अटक होत नाही. तोपर्यंत कामावर हजर होणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तसेच न. प. कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे पालिकेतील कामकाज सकाळपासून विस्कळीत झाले होते.