पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये देशातील जालना जिल्हा प्रथम
By admin | Published: April 21, 2017 04:13 PM2017-04-21T16:13:17+5:302017-04-21T16:13:44+5:30
2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 21 - 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पारितोषिक स्वीकारले.
दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पहाण्याची व्यवस्था जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली होती. दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान पीकविमा योजनामध्ये महाराष्ट्रातील जालना जिल्हा अव्वल आल्याची घोषणा करताच जालना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांनी टाळयांच्या कडकडाटाने आनंद व्यक्त केला. मुंबई दूरदर्शनच्यावतीने निर्माता मारुती मोगले व तंत्रज्ञ श्री मुपोनादी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्वांचा उत्साह कार्यक्रमस्थळातील मान्यवरांपर्यंत ओबी व्हॅनच्या माध्यमातून पोहोचविला.