जालना जिल्हा रूग्णालयातील १०० किलो व्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प झाला सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:13 AM2019-08-23T00:13:38+5:302019-08-23T00:16:18+5:30

जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या ८० लाख रूपये निधीतून येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

Jalna District Hospital has started a 2 kW solar power plant | जालना जिल्हा रूग्णालयातील १०० किलो व्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प झाला सुरू

जालना जिल्हा रूग्णालयातील १०० किलो व्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प झाला सुरू

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या ८० लाख रूपये निधीतून येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. १०० किलोव्हॅटच्या प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेवर रूग्णालयातील सर्व उपकरणे चालत आहेत. विशेषत: साडेसहा हजार लिटरचे सौर उष्ण जल संयंत्रणही सुरू करण्यात आले असून, अंतररूग्ण विभागातील रूग्णांना गरम पाणी मिळू लागले आहे.
जालना येथील २६० खाटांच्या या शासकीय रूग्णालयात दैनंदिन ३०० वर रूग्ण उपचारासाठी दाखल असतात. तर बाह्यरूग्ण विभागात दीड ते पावणेदोन हजार रूग्ण उपचारासाठी येतात. जिल्हा रूग्णालयातील विजेवर चालणाºया उपकरणांसाठी महावितरणची वीज वापरली जात होती. यासाठी जिल्हा रूग्णालयाला सहा ते सात लाख रूपयापर्यंत महिन्याला वीजबिल भरावे लागत असे.
अत्यावश्यक सेवेपैकी एक असलेल्या जिल्हा रूग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर निधीपैकी जवळपास ८० लाख रूपये खर्च करून १०० किलोव्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. यात आयपीडी, आयसीयू विभागाच्या इमारतीवर ५० किलोव्हॅटचा, ओपीडी विभागावर ३० किलो व्हॅटचा, नर्सिंग ट्रेनिंग सेंटरवर १० किलोव्हॅटचा तर नेत्र विभागाच्या इमारतीवर १० किलो व्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पातून वार्षिक सरासरी दिवसाकाठी ३५० ते ३७० युनिट विज निर्मिती होत आहे. या प्रकल्पामुळे रूग्णालयाला येणाºया वीजबिलातून सुटका झाली असून, सध्या एक ते दीड लाखा पर्यंत वीजबिल येत आहे. जिल्हा रूग्णालयातील अंतररूग्ण विभागात उपचार घेणाºया रूग्णांना, नर्सिंग सेंटरमधील विद्यार्थीनींना गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ६५०० लिटरचा सौर उष्ण संयंत्र कार्यान्वित करण्यात आला आहे. एक संयंत्र अंतररूग्ण विभागाच्या इमारतीवर तर दुसरा नर्सिंग ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीवर सुरू आहे.

Web Title: Jalna District Hospital has started a 2 kW solar power plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.